आजही प्रत्येक संध्याकाळी दिवेलागण होताना
त्याला आठवतात ते जीवघेणे गळफास
कुण्या तरी अजस्र्र लोंढ्यानं त्याच्या मानगुटावर बसून
दाबले आहे स्वतंत्र असा भास होतो,
आणि गर्दीतल्या कुणीतरी फेकून हानलेल्या
दगडाचा तो मालक होतो.
त्याच्या शेताच्या बांध्यावर त्यानं
पुरून ठेवलेत दुष्काळ
त्याच्या गावाच्या वेशीवर
टांगलेली आहेत लक्तर जातीपातीची.
अश्या जीवघेण्या
वैराण वाळवंटात जगतोय तो.
इथून पुढची प्रत्येक संध्याकाळ होत जाणार आहे भयानक
त्याच्यासाठी,
त्याला राम,म्हणावं लागणार आहे
अल्ला म्हणावं लागणार आहे
शेकोटी जवळ बसलेला प्रत्येक माणूस
त्याच घर जाळायला बसलाय
याची त्यालाही जाणीव आहे.
म्हणूनच त्यानं आपलं शस्त्र लपून ठेवलय
तो कानोसा घेऊन आहे .
कुठंतरी क्रांतीचा आवाज घुमण्याची
तेंव्हा तो त्याच्या कबिल्यासह बाहेर पडणार आहे
कापाकापी करण्यासाठी.
हनुमान कऱ्हाळे...........(पार्टनर)..
२३/१२/२०१७.
०९:३७ AM
त्याला आठवतात ते जीवघेणे गळफास
कुण्या तरी अजस्र्र लोंढ्यानं त्याच्या मानगुटावर बसून
दाबले आहे स्वतंत्र असा भास होतो,
आणि गर्दीतल्या कुणीतरी फेकून हानलेल्या
दगडाचा तो मालक होतो.
त्याच्या शेताच्या बांध्यावर त्यानं
पुरून ठेवलेत दुष्काळ
त्याच्या गावाच्या वेशीवर
टांगलेली आहेत लक्तर जातीपातीची.
अश्या जीवघेण्या
वैराण वाळवंटात जगतोय तो.
इथून पुढची प्रत्येक संध्याकाळ होत जाणार आहे भयानक
त्याच्यासाठी,
त्याला राम,म्हणावं लागणार आहे
अल्ला म्हणावं लागणार आहे
शेकोटी जवळ बसलेला प्रत्येक माणूस
त्याच घर जाळायला बसलाय
याची त्यालाही जाणीव आहे.
म्हणूनच त्यानं आपलं शस्त्र लपून ठेवलय
तो कानोसा घेऊन आहे .
कुठंतरी क्रांतीचा आवाज घुमण्याची
तेंव्हा तो त्याच्या कबिल्यासह बाहेर पडणार आहे
कापाकापी करण्यासाठी.
हनुमान कऱ्हाळे...........(पार्टनर)..
२३/१२/२०१७.
०९:३७ AM
Apratim majhya mitra...
ReplyDeletedhanyavad bahu
Delete