मनूच राज्य येतंय ..
पेटत चाललेल्या शहरांकडे
मी नुसता बघत होतो
उठलेल्या आरोळ्या किंकाळ्या
आणि धुपटाच्या झोतातून
ओरडत होते महापुरुष '
विविध पोशाखातल्या
चार-दोन मनुवाद्यांची जत्रा
माझ्याच शहरातून गेली
अन दोन वतनाची पुन्हा एकदा
गर्जना ऐकू आली
हे आता असाच पेटत राहणार
इतिहासातही होत आताही राहणार
हजारो वर्ष्यांचा पारतंत्र्याचा शाप उरावर आहे
आजच कोण मुहूर्त म्हणून
आपण मुक्त होणार.
लढाई कधीचीच संपलेली आहे
आता उरलेत फक्त जीवघेणे डावपेच
उधळल्या धुराचं अंजन जरी डोळ्याला
मस्ताडलेला प्रत्येक तरुण
त्याचा जीव जाईपर्यंत लढेल .
कारण महापुरुषांचे नाही तर
माणसातला स्वार्थ लढतोय
चिल्यापिल्यानो डोळे झाकून घ्या
पुन्हा एकदा मनूच राज्य येतंय
आपल्याला पारतंत्र्यातच ठेवण्यासाठी.
partner.....
पेटत चाललेल्या शहरांकडे
मी नुसता बघत होतो
उठलेल्या आरोळ्या किंकाळ्या
आणि धुपटाच्या झोतातून
ओरडत होते महापुरुष '
विविध पोशाखातल्या
चार-दोन मनुवाद्यांची जत्रा
माझ्याच शहरातून गेली
अन दोन वतनाची पुन्हा एकदा
गर्जना ऐकू आली
हे आता असाच पेटत राहणार
इतिहासातही होत आताही राहणार
हजारो वर्ष्यांचा पारतंत्र्याचा शाप उरावर आहे
आजच कोण मुहूर्त म्हणून
आपण मुक्त होणार.
लढाई कधीचीच संपलेली आहे
आता उरलेत फक्त जीवघेणे डावपेच
उधळल्या धुराचं अंजन जरी डोळ्याला
मस्ताडलेला प्रत्येक तरुण
त्याचा जीव जाईपर्यंत लढेल .
कारण महापुरुषांचे नाही तर
माणसातला स्वार्थ लढतोय
चिल्यापिल्यानो डोळे झाकून घ्या
पुन्हा एकदा मनूच राज्य येतंय
आपल्याला पारतंत्र्यातच ठेवण्यासाठी.
partner.....
Comments
Post a Comment