TERMS & CONDITIONS VIA PRIVACY




TERMS & CONDITIONS VIA PRIVACY

बिग डेटा हे नाव आपण आजकाल बऱ्याचदा ऐकतो. कॉम्पुटर क्षेत्रात तर हा परवलीचा शब्द. बर बिग डेटा म्हणजे तरी नेमकं काय ? तर अशी गुंतागुंतीची आणि खूप मोठ्या प्रमाणात साठवलेली माहिती, एव्हढ्या मोठ्या प्रमाणात कि दिवसाला 2.5 quintillion (1,000,000,000,000,000,000 बाईट्स ) डेटा दरोरोज वापरकर्त्यांकडून महाजालावर(इंटरनेट ) टाकल्या जातो.



आता ह्या एव्हढ्या मोठ्या माहिती वर देखरेख कशी ठेवली जाते हा भाग अलहिदा, पण एव्हढी मोठी माहिती महाजालावर कोण टाकतो? हा प्रश्न इथे महत्वाचा. आणि त्याच उत्तर आहे

तुम्ही स्वतः !



महाजाल सर्वत्र पसरलेल आहे तुमच्या घरातल्या AC पासून, संगणक, तुमची कार ते मोठ्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या महासंगणकापर्यंत. आणि हीच तर खरी गंमत आहे आणि गोमही. खरं म्हणजे सगळं जग फक्त आपल्यासारख्या वापरकर्त्या लोकानमुळॆच चालत! ते कस बघुत.



कृत्रिम जाहिरात (डीजिटल मार्केटिंग ) विषयी तुम्ही ऐकलंच असेल. सगळं जग या जाहिरातीवर चालत. म्हणजे गूगल फेसबुक सारख्या बलाढ्य कंपन्याही संपूर्ण यावरच अवलंबून असतात.

नाहीतरी गुगल फेसबुक आपल्या आजीसारखेच नाही का! आपण कोणताही प्रश्न पडला कि आजीला जाऊन विचारतो, तसच आपण गुगल लाही विचारतो पण यात एक धोका असतो तो म्हणजे आजीला आपली सगळी गुपित माहिती होतात. अगदी तसच जेंव्हा आपण काहीही गुगल वर सर्च करतो तेंव्हा हि सगळी गुपित गुगल लाही माहिती होतात. आणि या तुम्हाला विचारून चोरलेल्या माहिती वर गूगल सारख्या बलाढ्य कंपन्यांचा तोल सांभाळून राहतो.


बर हि सगळी माहिती तुमच्या फोटोस पासून विडिओ पर्यंत, तुम्ही दिवसभरात किती संकेतस्थळांना (वेबसाइट्स ) भेट दिलीत?

किती तास कुठे होतात?
तुम्ही कुठे राहता?
तुमचा मोबाईल नंबर काय आहे?
gmail अड्रेस काय आहे?
तुम्ही सकाळी काय खालतं?
दिवसभरात कुठे फिरलात ?
तुमचा आवडता रंग कोणता आहे?
तुम्हाला प्रेयसी आहे का?
असेल तर तीच नाव काय आहे?
तुम्ही एखाद्या शहराला भेट दिलीत तर त्या शहराचं नाव काय आहे?
तुंम्ही तिथे का गेला होतात?
तुम्ही दिवसभरात कुणाला आणि किती वेळ फोनवर बोलतात आणि काय बोलतात?
तुम्ही दिवसभरात कुणाला मॅसेज केलेत आणि काय केलेत?.
तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे?

अशी आणि अशाच बऱ्याच प्रकारची माहिती कुणाला जर कळणार असेल तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी होकार देण्यास तयार असाल काय ? हा खरा प्रश्न .



आपण सगळेच नाही म्हणुत, पण मुळात असं नाही. आपली हि माहिती अगोदरच कुणाला तरी माहिती आहे. आणि हे आपल्यालाही माहिती आहे, पण आपण काहीच करू शकत नाही.कारण आपण हि आपली स्वतःची माहिती कुणाला तरी दिलेली आहे आणि सोबत तो आपल्या ह्या माहिती बरोबर काहीही मोडतोड करू शकतो , कुणालाही विकू शकतो. एकंदरीत त्याला वाटेल तसा त्या माहितीचा वापर करू शकतो ह्याचीही परवानगी आपण त्याला देऊन टाकली आहे. पण हे घडल कधी आणि केंव्हा झाल याच्याबद्दल आपल्यातले बरेच जण अनभिज्ञ असतील !


तर हि माहिती घेतलीजाते काही बलाढ्य कंपन्यान द्वारे, आता यामध्ये कोणत्या कंपन्या येतात?


तर पहिली आहे आपली सर्वात आवडती गूगल, फेसबुक , ट्विटर , इंस्टाग्राम आणि इतर.

जगाचा राज्यकारभार या कंपन्यांच्या द्वारे चालवल्या जातो आणि ह्या कंपन्या चालतात तुमच्या आमच्या खाजगी माहितीवर.

बघा आहे कि नाही लोकशाही ! पण या कंपन्यांना आपली खाजगी माहिती वापरण्याचा अधिकार कोण देतो ?.

अर्थात तुम्ही स्वतः !

जस नवं घर घेताना कागतपत्रावर आपली सही घेतली जाते, अगदी तसंच त्यांच्या सेवा वापरण्याच्या बदल्यात आपण आपली सर्व खाजगी माहिती त्यांना देऊन टाकतो.

हे कस घडतं तर वापरकर्ता करार (USER AGRIMENT) द्वारे .

ह्यात वरच सगळं लिहिलेलं असत. पण अतिशय किचकट अन वेंधळ्या भाषेत. एव्हढं कि एखाद्या चांगल्या हुशार माणसाला ते सर्व वाचायला दोन ते तीन तास लागतील. आणि आपल्यातल्या कुणालाच ते वाचायला वेळ नसतोच, अन असला तरी त्यातील माहिती अश्या प्रकारे लिहिलेली असते कि ती एखाद्या वकिलाच्याही पदरी पडणार नाही. मुद्दाम सर्व कॅपिटल शब्द वापरने, उगीचच दिलेली माहिती खूपच लांब लिहिणे, वापरकर्त्याला वाचण्यास कंटाळा येईल असा फॉन्ट वापरने ह्याही गोष्टी त्यात सर्रास चालतातच.

मानवी सायकॉलॉजिचा वापर करून कमीत कमी लोक ते कस वाचतील यावर भर दिलेला असतो. आणि आपण सर्व या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असतो !



हे एव्हढ्यावरच मर्यादित असत तर चाललं असत पण,

आपण दिलेल्या परवानगीच्या आधारे दिवसाचे चोवीस तास आपल्यावर लक्ष ठेवणं. आपल्या मोबाईल वर कॉम्पुटर वर कोण कस आणि कधी यावं यात हस्तक्षेप करण. तुमच्या मोबाइलला वर कधीही तुम्हाला फोन किंवा मॅसेज करणं. पुन्हा पुन्हा तीच माहिती पाठवून ब्रेन वॉश करणं. आपण केलेलं खाजगी फोन मॅसेज यांच्यातली महिती दुसर्यांना विकन, त्यावर नजर ठेवणं. आपल्या कॅमेऱ्यावर, ऑडिओ रेकॉर्डिंगवर संपूर्णपणे लक्ष ठेवणं. आपण परवानगी दिलेली नसताना आपल्या लोकेशन घेणं. ह्या खऱ्या त्रासदायक गोष्टी असतात, आणि ह्या कंपन्या ह्या गोष्टी सर्रास पने करतात अगदी आता याक्षणीही आपल्या नकळत आपल्यावर लक्ष ठेवून आहेत.


हे सगळं घडत आपण दिलेल्या TERMS & CONDITION च्या परवानगीमुळं!


खाजागीपणा (प्रायव्हसी) नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात राह्यली नाही असं अनेक तज्ञ खेदाने सांगतात. यावर कळस म्हणून कि काय गव्हर्नमेंट, तुमचं सरकारहि ह्या खेळात सामील असत. सरकारच्या नजरेखालून एक न एक ओळ जात असते.


अलीकडेच भारत सरकारने एका कायद्याद्वारे आपल्या सर्व शाखा आणि गुप्तचर कुणावरही लक्ष ठेवू शकतात आणि कोणत्याही वापरकर्त्यांची महाजालावरची आणि संगणक मध्ये ठेवलेली कोणतीही माहिती कधी हि पूर्वसूचना न देता बघू शकतात. असा कायदा पारित केला आहे.


म्हणजे आता कुणीही व्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाऊ शकत नाही!





ह्या मधल्या कोणत्याच गोष्टी मधून आपल्याला मागे जात येणार नाही. पण आपण काही काळजी घेऊन आपलं व्यक्ती स्वतंत्र अबाधित ठेऊ शकतो आणि ते म्हणजे

  • कमीत कमी माहिती सोशल मीडियावर किंवा इतर कुठेही टाकणे.
  • TERMS & CONDITION वाचल्याशिवाय पुढे न जाणे, आणि सर्वात महत्वाचे
  • कोणत्याही ब्रेन वाशिंगला बळी न पडणे.

नाहीतर हि कार तुमची आहे हे माहिती असणाऱ्या एखाद् तुमच्या दुष्मनाने तुमच्या कार वर गोटे मारून तिला फोडणे. तुमच्या नकळत तुमच्या बँक बॅलन्स मधून लाखो रुपये कमी होणे. तुमच्या ऑटोमॅटिक अरिटीफिसिअल मोबाईल वर सिरी द्वारे रहमानच संगीत न लागता कुण्यातरी कार्यकर्त्याच्या पक्षच्या कार्यकर्त्याच्या शिव्या ऐकणे. किंवा तुमच्या गर्लफ्रेंड ने तुम्ही मुंबईत नसून पुण्यातच आहेत आणि माझ्याशी का खोट बोललात म्हणून तुमच्याशी ब्रेकअप करणे . तुमचे सर्व खाजगी मॅसेज वाचून तुम्हाला कुणीतरी ब्लॅकमेल करणे, तुम्ही इथे काढलेला फोटो अगदी एखाद्या दूरच्या नातेवाईकाच्या अकाउंट मध्ये आपोआप जाणे, किंवा तुम्ही कोणत्यातरी पक्ष्याचा किंवा देश्याच्या विरोधात अभद्र बोललात म्हणून तुम्हाला जेल ची हवा खवावी लागणे. हे दिवस काही फार दूर नाहीत हे आता आपल्या अवतीभोवती सतत घडते.


आणि इथून पुढे हा रोग अगदीच रोद्र रूप धारण करेल . इतकं कि तिसरं महायुद्ध ह्या साठवलेल्या माहितीसाठीच होणार असही काही तज्ज्ञ म्हणतात.


म्हणून आजपासून कोणत्याही TERM & CONDITION वर होकार देण्याआधी त्या वाचून घ्या.


लक्ष्यात ठेवा भिंतीलाही कांन असतात आणि इथल्या भिंतींना तर डोळेही आहेत !



- hanuman karhale
03-01-2019



Comments

Post a Comment

Popular Posts