#SAVEROSEDAY #SAVECHOCALATEDAY #SAVEHUMANITY

खंडेराव रोस डे चॉकॅलटे डे कॅन्सल झाला म्हणून उडती खबर आली. रोस डे चा इतिहास बघायचा झाला तर ग्रीक देवता EROS वरून ROSE हि संकल्पना आली. EROS म्हणजे देवाचं प्रेम.ग्रीकांपासून आज आपली संस्कृती फार फार लांब आली आहे. 21 व्य शतकाच्या प्रारंभीला मनुष्य प्राणी आज येऊन ठेपलाय. इथपर्यंत आपण अनेक चढउतार बघितले.प्रेम नावाची गोस्ट मात्र तीच राहिली. अथपासून इति पर्यंतचा मागे राहिलेला इतिहास आपण प्रेमाखातरच साजरा करतो. मग आज कलयुगात साजरे होत असलेले वॅलेंटाईने डे , जयंत्या , किंवा इतर तसम गोष्टी हे त्याचंच प्रतीक आहे. हे मानवाने मानवाला दिलेलं वंदन आहे. हा माणसाच्या इतिहासातला तो क्षण आहे जो शाश्वत राहणार आहे. बाकी आपलाही इतिहास डायनासॉरसारखाच पुस्तकातून पुढची पिढी वाचणार आहे. याच धर्तीवर विचार करायला गेलं तर पृथिवीच्या वयोमानानुसार आपण फक्त म्हणजे संपूर्ण मानव इतिहास सहा किंवा सात सेकंदाचा आहे. आणि एव्हड्या सगळ्यात ज्यांनी माजोरी मुजोरी केली त्यांची नाव इतिहासाच्या काळ्या कागदावर सुद्धा नाहीत .मग दोन किंवा चार लोकांनी विरोध केला म्हणून मानवी इतिहासाची गुंफण घालणारा रोस डे सारखा दिवस. एक नामाकिंत महाविद्यालयाने बंद करावा कि किती लांच्छनास्पद बाब आहे. आता काही लोकांना याच्यावरून काहीही फरक पडणार नाही. हजारो वर्ष्यांच्या इतिहासामध्ये आपण फक्त गुलामी पाहिलेली आहे. मग एखाद्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविणे हे आपल्या आता अंगवळणीच पडलेलं आहे.म्हणून दिलेला आदेश हाच फक्त शेवटचा म्हणून आपण तो पाळतोय. हि मानवी इतिहास लुप्त होण्याची सुरुवात आहे. जिथं उच्य पदस्थ अधिकारी ह्या मानवतेच स्वागत करत नाहीत तिथं खालच्या थराला मानव आजही कसा मनुवादात गुंतलेला आहे हे कळेल. आणि हि मनुवादाची संकल्पना भारताला एक दिवस नक्कीच गिळून खाईल. खरं तर इथे आपण आवाज उठवायला पाहिजेत. जी गोस्ट आजच्या पिढीला हवी आहे ती म्हणजे मुक्त प्रेम , मुक्त शिक्षण ह्या व्याख्या आपल्या डोक्याच्या पलीकडल्या असल्या तरी आपण त्या मानायला पाहिजेत.कारण उद्या जे काही शाश्वत राहणार आहे ते हे प्रेमच आहे.म्हणून हा लिखाणाचा खटाटोप कारण आज आपण ह्या मनुवादी लोकांच्या किंवा इतर कोणत्याही कारणाने असा मानवतेवर घाव बसत असेल तर शांत बसणार्यांना इतिहास नक्कीच प्रश्न विचारेल. आज गरज आहे खुल्या विचारांची यामुळे काहीलोकांना त्रास जरूर होत असेल,काही संस्कृतीच्या कथा सांगत असतील त्या सर्वानी मानव इतिहास एकदा वाचावा. कारण आज भूकंप आला आणि आपण सगळे लुप्त झालो , तर समोरच्या येणाऱ्या पिढ्या ह्या आपलं नाव कधीच काढणार नाहीत. तिथं अमेरिकेचा इतिहास वाचल्या जाईल , यूरोप खंडाचा इतिहास वाचल्या जाईल .आणि आपण आणि आपली संस्कृती म्हणजे रानटी लोकांच्या इतिहास म्हणून गृहीत धरण्यात येईल. जेंव्हा आपण इथपर्यंत विचार करूत तेंव्हा हे संस्कृतीचे पाश आपल्याला किती जाचक आहे हे कळेल. आणि उद्याच्या इतिहासाला आपण पूरक ठरुत.कारण "फक्त नावचं शाश्वत राहणार आहे इतिहास म्हणजे प्राणियुग आणि मानव युग" फक्त येव्हडाच....
बाकी रोस डे कॉलेज जीवनात तरी व्हायलाच पाहिजे नाहीतर काय म्हातारे झाल्यावर आम्हाला फुल द्यायला लावता काय..रोस डे तसा सर्व विध्यार्थी मिळूनच साजरा करतात. म्यानेजमेंट एक रुपयाही खर्चत नाही. आर्थिक बोज नाही , आणि शारीरिकही नाही ,काही लोकांना मानसिक बोज वाटत असेल पण त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही हिएक मानव आहात मानव प्राणी म्हणून विचार करा. ह्या माणसातलं प्रेम अमर करणाऱ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यांची आप्ल्यायला गरज आहे. ह्या विचारातून मग बघा तुम्हालाही पटेल. नाहीतर महाभारताची किंवा त्यासारख्या इतर ग्रंथदिकांची उदाहरण देऊन तुम्ही बोलत असाल तर बोलूच नका राहूद्या "हा लिखाणाचा खटाटोप फक्त हुशार आणि विचार करणाऱ्या बॊधिकांसाठी आहे."
शेअर करा म्हणजे MESSAGE ज्याच्या पर्यंत जायला पाहिजेत त्याच्यापर्यंत जाईल.

टिप "एव्हडं सगळं सांगून झाल्यावर तुम्हाला वाटेल कि मलाच कुणालातरी फुल देण्याची घाई झाली आहे तर तस नाही आम्ही ज्यांना फुल देणार आहे. तो आणखी आम्हाला सापडला नाही जेंव्हा सापडला तेंव्हा बघुत."

पण शेवटीला एक आहे हा रोस डे आपल्या कॉलेज मध्ये साजरा व्हायलाच पाहिजेत असा सर्वानी विचार करा म्हणजे काहीतरी होईल.नाहीतर आपणही डायनासॉरसारखे इतिहासाच्या एका पेजवर अलगद बसून जाईल....

partner
03/02/2018.
03:04PM.

Comments

Popular Posts